चंदगड/प्रतिनिधी:-- कोरोनाच्या छायेखाली असलेल्या गणेश उत्सवाची सांगता आज घरगुती गौरी-गणपती चे विसर्जन करून झाली. चंदगड तालुक्यात गणेश भक्तानी ताम्रपर्णी व घटप्रभा नदीत गणेश मुर्तीचे विसर्जन केले.काही मंडळानी निर्माल्या नदीत न टाकता एकत्र जमा केले.
कानूर,गवसे,म्हांळूगे,हिंडगाव, इब्राहिमपूर,सावर्डे, अडकूर येथील नागरिकांनी घटप्रभा नदीत तर झांबरे ,उमगाव, चंदगड, नागनवाडी, दाटे, माणगाव, डुक्करवाडी
,म्हाळेवाडी,निट्टूर,कोवाड,दुं डगे,कूदनूर,चिंचणे,कामेवाडी,रा जगोळी येथील नागरिकांनी ताम्रपर्णी नदीत गणेश विसर्जन केले यावर्षी चा गणेश उत्सव कोरोना व महापूराच्या भितीच्या छायेखाली नागरिकांनी साजरा केला.
No comments:
Post a Comment