कोवाड महाविद्यालयात "सदृढ भारत अभियान पंधरवडा "संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

07 September 2020

कोवाड महाविद्यालयात "सदृढ भारत अभियान पंधरवडा "संपन्न

कोवाड कॉलेजमध्ये सदृढ भारत योजनेअंतर्गत वृक्षारोपण करताना मान्यवर.
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
           सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड ता. चंदगड येथे महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आवाहणाने महाविद्यालयातील एन.एस.एस. विभागाअंतर्गत सदृढ भारत क्लब स्थापना करण्यात आलेला आहे या क्लब अंतर्गत  महाविद्यालयांमध्ये . देि. 2  ऑ गस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत सदृढ  भारत याअंतर्गत विविध उपक्रमांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले.
            महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक कर्मचारी आणि विद्यार्थी यांना ऑनलाइन पद्धतीने सूचना करण्यात आल्या आणि त्याप्रमाणे दैनंदिन शारीरिक व्यायामाचे प्रकार योगासने प्राणायाम रनिंग फिरणे साठी आवाहन करण्यात आले या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सर्व घटकांनी सामाजिक नंतर पालन करून वेगळ्या प्रकारचे व्यायाम कसरती आपापल्या घरी सुरक्षित राहून करण्यात आले त्याचबरोबर सामाजिक अंतर ठेवून काही योगासने ही करण्यात आली त्याचबरोबर महाविद्यालयातील  एन.एस.एस. विभागाने आणि शारीरिक शिक्षण अर्थ क्रीडा विभाग यांनी फिट इंडिया या कार्यक्रमांचे आयोजन प्राचार्य डॉ.व्ही. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा डॉ के एस काळे प्रा आर. टी पाटील यांनी केले होते समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ,तळागळातील लोकांपर्यंत सुदृढ आरोग्यासाठी संदेश पोहोचविण्याचे महाविद्यालय काम करत आहे. 
या विविध उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयामध्ये जुलै 2020 महिन्यामध्ये गंदगी मुक्त भारत अभियान राबवून विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या आधारे आवाहन व्हाट्सअप द्वारे करण्यात आले त्याला प्रत्येक गावातील                         विद्यार्थ्यांनी सदर स्वच्छता अभियानात, स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. 
तसेच या उपक्रमांतर्गत   महाविद्यालयां च्या क्रिडांगणाची स्वच्छता मोहीम आणि डागडुजी करण्यात आली त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए एस.जांभळे संस्था सचिव एम. व्ही. पाटील आणि संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी आणि प्राचार्य डॉ. व्ही आर.पाटील सर्व प्राध्यापक वृंद पदाधिकारी संस्था प्रतिनिधी , प्रशासकीय सेवक कर्मचारी  या सर्वांनी मिळून महाविद्यालय परिसरातील ग्राउंडची  साफ करण्यात आली. तसेच 150   सागवान  झाडांची लागवड करण्यात आली.
              सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांना दररोज सकाळी वॉकिंग, योगासने, व्यायाम इ.स्वतः करून गावातील जनतेकडून करून घ्यावे व त्यांना सदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून द्यावे असे आवाहन  करण्यात आले व त्याला योग्य प्रतिसाद मिळाला.
           महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाअंतर्गत 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन प्रसंगी विद्यार्थ्यांना आणि प्रशासकीय सेवक कर्मचारी सामाजिक अंतर ठेवून विविध योगासने करण्यात आली.

No comments:

Post a Comment