अथर्व-दौलतमध्ये दोन लाख टन ऊसाचे गाळप पुर्ण - अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2020

अथर्व-दौलतमध्ये दोन लाख टन ऊसाचे गाळप पुर्ण - अध्यक्ष मानसिंग खोराटे यांची माहीती

                               मानसिंग खोराटे

चंदगड / प्रतिनिधी:- 
हलकर्णी  ता.चंदगड येथील दौलत कारखाना हा चंदगडच्या शेतक - यांची खुरीखुरी दौलत आहे . शेतकरी विश्वास ठेवून कारखान्याला ऊस पुरवठा करत आहेत.शेतकरी,कामगार यांच्या सहकार्याने आज अखेर दौलत-अथर्व ने दोन लाख मे.टन उसाचे गाळप केल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. बंद पडलेला दौलत कारखाना अथर्व कंपनीने ऊस उत्पादक शेतकरी,कामगार,हितचिंतक यांच्या विश्वासावर गेल्या वर्षी सूरू केला,शेतकर्यानीही दौलत प्रमाणेच अथर्व कंपनीला सहकार्य केले,त्यांच्या विश्वासास पात्र राहून गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा गाळप झालेल्या उसाची बिले वेळेत अदा केली आहे.या वर्षी 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण होईल . कारखान्यामध्ये पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये 2 लाख मे.टन ऊस गाळपाचा टप्पा पार झाला असून कारखाना पुर्ण क्षमतेने सुरु आहे . तसेच चंदगड तालुक्यातील ऊसाचे 1.75 लाख मे.टन गाळप केले आहे . हत्ती बाधीत हेरा , चंदगड , कानूर व घाटरकवाडी , गवसे आजरा गटामधील गांवातील क्षेत्रामध्ये बीड व स्थानिक अशा एकूण 100 टोळया कार्यरत असून , प्रत्येक गांवामध्ये अग्रक्रमाने तोडणी सुरु आहे . यावर्षी उत्पादीत झालेले कंपोष्ट खत रु .600 / - अधिक जीएसटीसह विक्री करणेचे धोरण ठरले आहे. , त्याप्रमाणे कारखाना साईटवरुन वितरीत होत आहे . तसेच कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे गाळप करुनच कारखाना बंद करणार असल्याचे अथर्व इंटरट्रेड चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले .No comments:

Post a Comment