दाटे येथे वाढदिवसानिमित्य ग्रंथांचे वाटप करताना संत मंडळी.
तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
दाटे (ता. चंदगड) गावचे वारकरी संप्रदायचे मार्गदर्शक ह.भ.प.श्री विठ्ठल लखमाना गुरव यांचा ८१वा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी हजारो रूपयांचे ग्रंथ वारकरी संप्रदायातील संत जनाना वाटण्यात आले. यावेळी वारकरी सांप्रदायाला ज्ञानेश्वरी, महाभारत, संतवचने,इत्यादी पुस्तके भेट म्हणून विठ्ठल गुरव यानी वाटप केली. त्याबरोबरच दाटेच्या केंद्रीय मराठी शाळेला सुद्धा वाढदिवसानिमित्त पुस्तके वाटप केली. यावेळी विठ्ठल गुरव यांची मुले, जावई, नातवंडे, पणतू, नातेवाईक यांच्या बरोबरच डॉ. विश्वनाथ पाटील, चंदु साबळे, राहुल गावडे, नामदेव गोरल, आनंद सदावर, शंकर भुजबळ, नारायण सदावर, श्री.जोशी , महादेव गुरव, महादेव गावडे दाटे ग्रामस्थ उपस्थित होते. आभार- गजानन पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment