चंदगड निवडणूक विभागाचा सावळा गोंधळ, कर्मचाऱ्यांना दोन -दोन निवडणूक आदेश - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2020

चंदगड निवडणूक विभागाचा सावळा गोंधळ, कर्मचाऱ्यांना दोन -दोन निवडणूक आदेश

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालूक्यात १५ जानेवारीला होत असलेल्या ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी निवडणूक विभागाकडून कर्मचारी नियूक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. पण बहूतांश कर्मचाऱ्यांना दोन -दोन पथकामध्ये नियूक्तीचे लेखी आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे .
     ग्रामपंचायत निवडणूकीसाठी चंदगड तालूक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियूक्ती करण्यात आली आहें . यासाठी १४४ पथके तयार करण्यात आली आहेत . प्रत्येक पथकात चार कर्मचारी नियूक्त केले आहेत . या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दि .६ व ११ जानेवारी रोजी चंदगड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे .
 यासंदर्भातील नियुक्ती आदेश कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आले आहेत . पण एकाच कर्मचाऱ्याची दोन पथकामध्ये नियूक्ती करून दोन वेगवेगळे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे . नेमका कोणता आदेश स्विकारावा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे .सध्या दोन्ही आदेश स्वीकारले असले तरी प्रशिक्षणास उपस्थित राहताना पून्हा गोंधळ निर्माण होणार आहे . यापूर्वीच्या अनुभवानुसार एक आदेश स्विकारून प्रशिक्षण केल्यास दुसऱ्या आदेशात अनुपस्थिती लागते . 
लगेच निवडणूक विभाग कारणे दाखवा नोटीस बजावतो . या सर्वाचा नाहक त्रास सर्व कर्मचाऱ्यांना होतो . त्यामूळे निवडणूक विभागाने असे दोन दोन दिलेल्या नियूक्ती आदेशांचे त्वरीत स्पष्टीकरण करून हा गोंधळ थांबवावा अशी मागणी कर्मचारी वर्गाने केली आहे .


No comments:

Post a Comment