चंदगड – ग्रामपंचायत निवडणुकीतील छाननीमध्ये १४ अर्ज अवैध, वाचा कोणत्या ग्रामपंचायतीचे अर्ज छाननीत ठरले अवैध? - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2020

चंदगड – ग्रामपंचायत निवडणुकीतील छाननीमध्ये १४ अर्ज अवैध, वाचा कोणत्या ग्रामपंचायतीचे अर्ज छाननीत ठरले अवैध?


सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

           चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका लागल्या असून काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी १०१९ व्यक्तींनी १०५१ अर्ज दाखल केले होते. आज छाननीमध्ये ८ ग्रामपंचायतीचे १४ अर्ज अवैध ठरले आहे. त्यामुळे आता १०३७ अर्ज शिल्लक आहेत. 

      नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. 

       ४१ ग्रामपंचायतीसाठी १०१९ व्यक्तींचे १०५१ अर्ज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झाले होते. यामध्ये 14 अर्ज अवैध ठरले असून १०३७ अर्ज वैध ठरले आहेत. अवैध ठरलेल्या अर्जांची ग्रामपंचायत निहाय यादी, कंसात अवैध संख्या - कालकुंद्री (१), माळेवाडी (१), म्हाळेवाडी (१), होसूर (१), शिनोळी खुर्द (२), सुंडी (१), चिंचणे (३) तर पुंद्रा (४) असे एकूण १४ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे आता १०३७ अर्ज निवडणुक रिंगणात आहेत.



No comments:

Post a Comment