नगरगाव (ता. चंदगड) परिसरात जंगलात फिरायला गेलेल्या चार दुभत्या जनावरांचा पट्टेरी वाघने फडशा पडला असून परिसरात या पटेरी वाघाची दहशत माजली आहे. वाघाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाघाच्या हल्यातील मयत म्हैशीसमवेत धूळाआप्पा कोकरेचंदगड तालुक्यातील नगरगाव परिसरातील धामणे या कर्नाटक राज्यातील गावाला चहुबाजूने बाजूने चंदगड ची जंगलव्याप्त सीमा आहे. या गावातील चार जनावरे पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याने येथील धनगर समाजावर मोठे संकट पसरले आहे. शिकार केलेल्या म्हशीचे मांस खाण्यासाठी वाघ मोठ्याने डरकाळ्या फोडत परिसरात फिरत असल्याने परिसरातील धनगर बांधव भयभीत झाले आहेत. धूळाआप्पा कोकरे या धनगर बांधवाच्या चार म्हशी पठारे वाघाने फस्त करून मोठे आर्थिक नुकसान केले आहे. धामणे हे गाव कर्नाटक राज्यात जरी असले तरी त्याच्या चहुबाजूने चंदगड जंगलव्याप्त सीमा असल्याने आर्थिक नुकसान कोणत्या राज्याकडे मागावे हा प्रश्न इथल्या लोकांना नेहमीच पडतो.
No comments:
Post a Comment