ऑनलाइन प्रोजेक्ट स्पर्धेत रोशन पाटील राज्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2021

ऑनलाइन प्रोजेक्ट स्पर्धेत रोशन पाटील राज्यात प्रथम

                           
                                       रोशन नारायण पाटील

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
          कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील व नवोदय विद्यालय कागलचा विद्यार्थी रोशन नारायण पाटील (इ. ८ वी) याने रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्ट (पर्जन्य जल संचयन) तयार केला होता. यामध्ये राज्यातील ७१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पूणे रिजन मध्ये ऑनलाइन प्रोजेक्ट प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये त्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मध्यप्रदेश, गुजरात, पुणे, अमरावती, अहमदाबाद, गांधीनगर रिजन मधूनही तृतीय क्रमांक मिळवला. त्याला प्राचार्य के. श्रीनिवास, प्रशिक्षक एन. के. डेंगळे यांच्यासह वडील नारायण पाटील, तानाजी गडकरी, नारायण गडकरी  व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. 
फोटो : 

रोशन पाटील

No comments:

Post a Comment