ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असेल तर मोठी सत्ता मिळवता येते - उच्च व तंत्र मंत्री उदय सामंत, हलकर्णी येथे ग्रामपंचायतीच्या प्रचारार्थ सभा - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2021

ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असेल तर मोठी सत्ता मिळवता येते - उच्च व तंत्र मंत्री उदय सामंत, हलकर्णी येथे ग्रामपंचायतीच्या प्रचारार्थ सभा

 हलकर्णी (ता. चंदगड) तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,  शेजारी अरूण दुधवाडकर, विजय देवणे, संग्राम कूपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, भरमाणा गावडा आदी.


चंदगड / प्रतिनिधी 

       आम्ही कॅबिनेट मंत्री नंतर त्याआधी बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. ज्यां कार्यकर्त्याच्या जीवावर आम्ही निवडून मंत्री झालोय त्याच्या प्रचारासाठी नाही येणार तर मग कधी येणार. बाळासाहेबांच्या विचारांची तलवार कोणी काढून घेवू शकत नाही. त्यामुळे जे खासदरकीला मताधिक्य मिळत ते विधानसभेला मिळवण्याचा आम्ही संकल्प करू. त्यासाठी ग्रामपंचायती ताब्यात असणं महत्वाचं आहे. ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असल्याची मोठी सत्ता मिळवता येते असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते. प्रारंभी प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य भरमाणा गावडे यांनी केले.

     मंत्री उदय सामंत म्हणाले, ``चंदगड तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्याशी बोलून वेगळे नियोजन करणार आहे. आधीपासूनच काजूशी आमंच अतूट नाते आहे. त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. पर्यटन, किल्ले व काजू यासाठी या वर्षभरात पायाभूत काम नक्की होईल  अशी ग्वाही देखील यावेळी दिली. सीमा भागातील मराठी बांधवाची कर्नाटक सरकारकडून नेहमीच गळचेपी सुरू आहे. सीमा भागातील मराठी बांधवाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सीमा भागात विद्यापिठातंर्गत शैक्षणिक संकुल उभं करत आहोत.या शैक्षणिक संकुलामध्ये सर्व सोयीनीयुक्त असे मोठे ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. याचा लाभ कर्नाटकातील मराठी विद्यार्थ्याना होणार असून या शैक्षणिक संकुलचा तालुक्यातील महाविद्यालयावर कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही दिली.``

          संपर्कप्रमुख अरूण दुधवाडकर म्हणाले, ``यावेळी चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळणार आहे.  एकवेळी ज्या गावात उमेदवार शोधावे लागत होते. त्यावेळी एक शिवसैनिक स्वत: व स्वत:च्या पत्नाला उभे केले. आज मात्र हे चित्र पालटून शिवसेनेचे सर्व पॅनेल उभे राहिले आहे. हे शिवसैनिकांनी घेतलेली मेहनत आहे.`` 

         संग्राम कुपेकर यांनी सीमा भागातील मराठी बांधवाना न्याय मिळावा हि सेनेची तळमळ आहे. विकासाचा बॅक लॉग भरून काढण्यासाठी चंदगड तालुका दत्तक घ्यावा असे आवाहन केले.  

     यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, चंदगड विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर, जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, माजी जि. प. सदस्य शिवाजी सावंत यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला संजय पवार, माजी जि. प. सदस्य भरमाणा गावडा, राजू रेडेकर, संभाजी पाटील,  कृष्णराव वाईगडे,  रोशन शमनजी, भारती शिंगटे,  संज्योती मळवीकर, शांता जाधव, श्वेता नाईक,  शांता जाधव, राहुल पाटील, अनिल पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन पवन सावंत यांनी केले तर आभार सरपंच एकनाथ कांबळे यांनी मानले.




No comments:

Post a Comment