चंदगड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2021

चंदगड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन संपन्न

 

चंदगड महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, शेजारी प्राध्यापक.

चंदगड / प्रतिनिधी

र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवा दिन संपन्न झाला. 

       अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. त्यानी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये असे विचार व्यक्त केले की शिक्षण हे समाजाप्रती उत्तम जाणिवा निर्माण करून सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करते. समाजात धार्मिक तेढ निर्माण करणा-या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला पाहिजे. समाज बिघडविण्याचे षडयंत्र यांच्याकडूनच पसरविले जाते. व्यक्ती विरोध नको पण समाजाला अधोगतीकडे नेणा-या विचारांना विरोध करायला शिका. भौतिक विकासाबरोबरच मानसिक विकास साधता आला तरच मानवजीवन आणि पर्यायाने निसर्गाची ही हानी टाळता येईल. धर्म धारणा करतो,अवधारना नाही, प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी स्वीकारणे हे आपणा युवकांचे कार्य आहे, विज्ञाननिष्ठ व विवेकशील बना, अंधश्रद्धा, मत्सर, जातीभेद, वर्णभेद करू नका. या दोनही महान व्यक्तींनी समाजाला हाच मोलाचा संदेश दिला आहे. याचसाठी अशा प्रेरणादायी कार्यक्रमांची गरज आपल्याला आहे.

       प्रास्ताविक व कार्यक्रमाचा हेतू प्रकल्प अधिकारी प्रा संजय पाटील यांनी स्पष्ट केला, एनएसएस गीत व शौर्यगीत नीतीन सुतार व ग्रुपने सादर केले. प्रा. ए. डी. कांबळे, सोनाली दळवी, तय्यबा मुल्ला, ज्योति पाटील, सुजाता झेंडे, दिपा गावडे, नामदेव चांदेकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्याचा मनोगतातून आढावा घेतला, कु.मृणाली नाईक हिने सूत्रसंचालन केले तर आभार सोनाली आर्दाळकर हीने मानले.No comments:

Post a Comment