बेळगाव येथे चंदगड रहिवासी संघटना व चंदगड मल्टीपर्पज सोसायटीतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2021

बेळगाव येथे चंदगड रहिवासी संघटना व चंदगड मल्टीपर्पज सोसायटीतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

 

बेळगाव : ध्वजारोहण करताना नाविक दलाचे निवृत्त अधिकारी अशोक पाटील. शेजारी इतर.

कागणी : प्रतिनिधी

 बेळगाव येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटना व चंदगड को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतमाता प्रतिमा पूजन निंगाप्पा पाटील यांनी केले. तर नाविक दलाचे निवृत्त अधिकारी अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी चंदगड तालुका रहिवासी संघटनेचे अध्यक्ष एम. के. पाटील, चंदगड सोसायटीचे चेअरमन एकनाथ पाटील यांची भाषणे झाली. सोसायटीचे संचालक भागोजी गावडे, अशोक थोरात, मारुती गावडे, डी. बी. पाटील, सुनिल पवार, महेश क्यात्ययंनावर, 

 सुरेश राजगोळकर, संजय खवणेवाडकर, प्रफुल्ल शिरवळकर, शंकर ओऊळकर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अशोक थोरात यांनी मानले.
 

No comments:

Post a Comment