कुदनूर सरपंच शालन कांबळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2021

कुदनूर सरपंच शालन कांबळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

 

कुदनुर (ता. चंदगड) येथे मतदानासाठी लागलेली रांग.

चंदगड / प्रतिनिधी

       कुदनूर (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच शालन चंद्रकांत कांबळे यांच्या विरोधात १३८० विरुद्ध ६०६ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला.

          सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, अवास्तव खर्चाचे हिशोब न देणे, प्रोसिडींग आपल्या मर्जीप्रमाणे उतरवणे, ठराव चुकीचे घालणे, पतीला कारभारी बनविणे आदी कारणांमुळे सदस्यांनी अविश्वास ठराव मांडण्याची मागणी केली होती. यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दि. २५ रोजी विशेष सभा घेण्यात आली.  या सभेत दहा विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सदर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यानूसार आज मतदान प्रक्रिया पार पडली. शालन चंद्रकांत कांबळे यांच्यावर १० विरुद्ध शून्य अशा मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला होता. या अविश्वास ठरावासाठी आज सोमवार दि. १५ रोजी प्राथमिक शाळा कुदनूर येथे गुप्त मतदान घेण्यात आले. या मध्ये सरपंच  शालन कांबळे याांना ६०६ नागरिकांनी तर त्यांच्या विरोधात १३८० नागरिकांनी मतदान केले. तहसीलदार विनोद रणवरे याांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी चंंद्रकांत बोडरे यानी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.



No comments:

Post a Comment