![]() |
डुक्करवाडी येथे मंगळवारी महालक्ष्मी मंदिराचा कळसारोहण सोहळा. |
चंदगड / प्रतिनिधी
डुक्करवाडीसह (रामपूर) बागिलगे, धुमडेवाडी, गुडेवाडी, मौजे जट्टेवाडी, मजरे जट्टेवाडी, नरेवाडी या गावांचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम मंगळवार १६ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित केला आहे. वेदशास्त्र संपन्न एल. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ व १६ फेब्रुवारी २०२१ रोजी संपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. या निमित्त हरिपाठ, भजन, प्रवचन, कीर्तन कळसपूजन, होमवहन, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच कळस मिरवणूक काढण्यात येणार आहे. हभप कृष्णानंद शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते कळसारोहण करण्यात येणार आहे. या निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सर्वांनी मास्कसह उपस्थित रहावे असे आवाहन उत्सव समिती मार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment