अडकूर येथे गोठ्याला लागलेल्या आगीत चार जनावरे गंभीर, तीन लाखांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2021

अडकूर येथे गोठ्याला लागलेल्या आगीत चार जनावरे गंभीर, तीन लाखांचे नुकसान

अडकूर (ता. चंदगड) येथे गवत गंजीला लागलेल्या आगीत तीन लाखांचे नुकसान झाले. 


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         रखरखत्या उन्हामध्ये शिवशक्ती हायस्कूलपासून २०० मिटर अंतरावर असणाऱ्या प्रशांत प्रल्हाद पाटील (रा. अडकूर) यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीत चार जनावारांचा आगीत होरपळून गंभीर जखमी झाली. येथे गवताच्या गंजीसह शेती औजारे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले. आज दुपारी १ .३० च्या दरम्यान येथील परिसराला आग लागली आगीचे कारण मात्र समजू शकले नाही . 

           उन व वाऱ्यामुळे आग प्रचंड भडकली. आग लागल्याचे लक्षात येताच रविंद्र निळकंठ, तानाजी गुरव, सुशांत गुरव, श्री शिवशक्ती हायस्कूलचे कर्मचारी अजित गणाचारी, शिक्षक एस. के. पाटील यानी धाव घेऊन परिसरात पसरणारी आग आटोक्यात आणली. पण त्यापूर्वी  गोठ्यातील एक गाय, दोन म्हशी, एक रेडकू आगीमध्ये भाजून गंभीर जखमी झाले. सुदैवाने जवळच काजूच्या झाडाखाली बांधलेले प्रशांत पाटील यांचेच शर्यतीचे बैल वाचले. शेतकरी कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment