पाटणे ता.चंदगड येथील जंगलात नाग सापाला सोडताना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील,सर्पमित्र पाटील, वनपाल भांडकोळी,धामणकर आदी |
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील ह. भ. प.बाळु धामणेकर यांच्या काजु बागेत मुंगुस व नाग साप यांच्यातील झुंज सुरु होती. यामध्ये मुंगुसाने सापाला जखमी केले होते. साप घाबरुन काजुच्या झाडावर चढुन बसला होता.
सदर घटना ढोलगरवाडी सर्प शाळेचे प्रा. सदाशिव पाटील व सहकारी यांनी मुंगुसाला हुसकावून लाऊन जखमी नागास झाडावरुन खाली सुरक्षित उतरवले. त्यानंतर गेले 8 दिवस त्याचेवर ढोलगरवाडी येथील पशुवैधकीय अधिकारी डॉ. अरुण मनगुतकर यांचेमार्फत उपचार केले. त्यानंतर आज सोमवार (दि. १५ रोजी) सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांनी पाटणे वनपरिक्षेत्राचे प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व स्टाफच्या मदतीने सापाला जंगल क्षेत्रात अधिवासात सुखरुप सोडणेत आले. सदर साप हा पुर्ण वाढ झालेला प्रचंड मोठा होता. मुख्याधापक एस. आर. पाटील, तानाजी कांबळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी वनपाल बी. आर. भांडकोळी, वनपाल एन. एम. धामणकर, वनरक्षक डि. एस. रावळेवाड, वनरक्षक दिपक कदम, विश्वनाथ नार्वेकर सुध्दा उपस्थित होते.
No comments:
Post a Comment