सरपंच आपल्या दारी, उपक्रमाची म्हाळेवाडीत सुरवात, काय आहे ही संकल्पना, वाचा सविस्तर.......... - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2021

सरपंच आपल्या दारी, उपक्रमाची म्हाळेवाडीत सुरवात, काय आहे ही संकल्पना, वाचा सविस्तर..........

सरपंच आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत सरपंच सी.ए. पाटील दारोदारी जाऊन समस्या जाणून घेताना

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

        म्हाळेवाडी ग्रामपंचायतीचे तरुण, तडफदार, उत्साही व विकासाचा ध्यास असलेले अभ्यासू नवनिर्वाचित सरपंच  सी. ए. पाटील व उपसरपंच  विजय मरणहोळकर यांनी `सरपंच आपल्या दारी` या  आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा आज शुभारंभ केला.

       दलित वस्ती सुधारणा अंतर्गत करण्यात येणार्‍या विकास कामांसाठी  जय भिम गल्लीतील सर्व ग्रामस्थ व भगिनींची प्रत्यक्ष भेट घेऊन तेथील समस्या   सरपंच , उपसरपंच तसेच या वार्डातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ. अमृता सुधिर कांबळे यांनी जाणून घेतल्या. या  वार्डातील विकासात्मक कामांबाबत चर्चा केली. यावेळी सुभाष नांदवडेकर, सुनिल कांबळे, सुधिर कांबळे, पी. एस. कांबळे, गुंडू कांबळे, तुकाराम कांबळे, हणमंत कांबळे, यल्लापा कांबळे, डी. एस. कांबळे व अन्य सहकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment