राजगोळीच्या सागरची जिद्दीच्या जोरावर 'सीए' पदवीला गवसणी - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2021

राजगोळीच्या सागरची जिद्दीच्या जोरावर 'सीए' पदवीला गवसणी

सागर संतराम पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

         राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील सागर संतराम पाटील यांने सनदी लेखापाल  (चार्टर्ड अकाैटंट) परीक्षा पास होण्याचा मान मिळवला. असा बहुमान मिळवणारा तो गावातील पहिलाच असून तालुक्यातील मोजक्या मानकऱ्यांच्या पंक्तीत त्याचा समावेश झाला आहे.

इन्स्टिट्यूटमधील सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मोजक्या विद्यार्थी व मार्गदर्शकांसह सागर पाटील

           राजगोळी बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी शिक्षण घेतलेल्या सागरचे माध्यमिक शिक्षण गावातील दत्त हायस्कूल, उच्च माध्यमिक शिक्षण कोवाड येथील श्रीमान व्ही पी देसाई ज्युनिअर कॉलेज, बी कॉम चे शिक्षण कला महाविद्यालय कोवाड अशा पूर्णपणे ग्रामीण भागात पार पडले. तर एम कॉमचे शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे झाले. पूर्णपणे ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सागरने केवळ जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर इतके मोठे यश प्राप्त केले. या कामी त्याला प्राध्यापक अरुण सुर्वे, सीए आर. एस. पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले. सागरचे यश हे चंगळवादाच्या मागे लागलेल्या तरुण पिढीला नक्कीच दिशादर्शक ठरणारे आहे. या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment