पंचायत समितीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून मुरकुटेवाडी, कोनेवाडी व नांदवडे येथे विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2021

पंचायत समितीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून मुरकुटेवाडी, कोनेवाडी व नांदवडे येथे विकास कामांचा शुभारंभ

पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगातून विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, सभापती ॲड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवनगेकर, माजी उपसभापती विठाबाई मुरकुटे, नंदिनी पाटील व इतर. 

चंदगड / प्रतिनिधी

      १५ व्या वित्त आयोगाच्या पंचायत समिती  निधीतून मुरकुटेवाडी, कोनेवाडी व नांदवडे पंचायत समितीचे सभापती ॲड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवनगेकर, माजी उपसभापती विठाबाई मुरकुटे, नंदिनी पाटील यांनी आपल्या निधीतून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, शांताराम पाटील, ॲड. रवी रेडेकर, अनिल शिवनगेकर, शामराव मुरकुटे, कोनेवाडीचे सरपंच, सदस्य मंडळ तसेच नांदवडे गावचे सरपंच सदस्य, ग्रामसेविका कुंभार, ग्रामसेवक पवार यांच्या उपस्थितीत तीन्ही रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

        चंदगड तालुक्यातील १५ व्या वित्त आयोगातून बंदित व अबंदित असे दोन हप्त्यांचा निधी 84 लाख 45 हजार इतक्या निधीची कामे तालुक्यात होणार असल्याचे सभापती ॲड अनंत कांबळे यांनी सांगितले. उर्वरीत कामांच्या निधीचा शुभारंभ माजी सभापती जगन्नाथ हुलजी, बबन देसाई, दयानंद काणेकर, रुपा खांडेकर आदीसह विद्यमान पंचायत समिती सदस्य लवकरच करणार आहेत. यावळी ठेकेदार महोदव गायकवाड यांनी नियोजित कामे वेळेवर करणार असलेचे आश्वासन दिले.




No comments:

Post a Comment