![]() |
माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे एकदिवसीय श्रमदान शिबीर राबविण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे एकदिवसीय श्रमदान शिबीर महाविद्यालय परिसर स्वच्छतेने संपन्न झाले. स्वयंसेवकांनी 'भारत स्वच्छता अभियानांतर्गत' स्वच्छतेकडून समृद्धीकडेचा नारा देत सर्व परिसराची स्वच्छता केली.
प्लास्टिकमुक्त अभियानाद्वारे 30 किलो प्लास्टिक जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. महाविद्यालयाच्या आवारातील झाडांना निंदनी करून, कुंपण व पाणी घालून त्यांचे संवर्धन केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश युवाशक्तीद्वारे घरोघरी पोहोचविण्यात स्वयंसेवक यशस्वी झाले. शिबिराच्या संपन्नतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. संजय एन. पाटील, प्रा. व्हि. के. गावडे, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. शाहू गावडे, डाॅ. एन. के. पाटील, एस. बी. हासूरे, अनिल पाटील, नितिन सुतार, पांडुरंग माईनकर व सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांचे सर्वांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
No comments:
Post a Comment