चंदगड शहरातील ब्रम्हनगर येथे विज वाहक खांब रोपन, नगरपंचायतीचे शिक्षण सभापती आनंद हळदणकर यांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2021

चंदगड शहरातील ब्रम्हनगर येथे विज वाहक खांब रोपन, नगरपंचायतीचे शिक्षण सभापती आनंद हळदणकर यांचा पुढाकार

  

चंदगड ब्रम्हनगर येथील विज वाहक खांब रोपन करण्यात आले.

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड येथील ब्रह्मदेव नगर ते  महसूल भवन पर्यंतच्या अंतरावर १२ विद्युत खांबाचे प्रत्यारोपन चंदगड नगरपंचायतीचे शिक्षण सभापती  बाळासाहेब उर्फ आनंद हळदणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला विजेच्या खांब हळदणकर यांच्या प्रयत्नातून बसवल्यामुळे येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

       नगरसेवक आनंद हळदणकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता विशाल लोधी  तसेच  रेडेकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी प्रसंगी  सुभाष आजरेकर, सुभाष गावडे, सुरेश गावडे, सागर गावडे, नितीन गावडे, गुलजार नाईकवाडी, पांडुरंग पाष्टे, श्रीमती गावडे तसेच किलबिल स्कूलचे संदिप चिंचणगी, प्रकाश कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment