मटका घेणाऱ्या दोघांना अटक, २१ हजारांचा मुद्देमाल जप्त, चंदगड पोलिसांची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2021

मटका घेणाऱ्या दोघांना अटक, २१ हजारांचा मुद्देमाल जप्त, चंदगड पोलिसांची कारवाई

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी फाटा व हलकर्णी फाटा येथे दोघांना कल्याण मटका घेताना चंदगड पोलिसांनी कारवाई करून  २१५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पो. नि. बी.ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

     ढोलगरवाडी फाटा ता चंदगड येथील काजू बागेत उघड्या जागेत कल्याण मटका घेताना संदीप शिवाजी कांबळे (रा. मौजे कार्वे,  वय- ३५) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्या कडील रोख रक्कमेसह ८९४८ चा मुद्देमाल जप्त केला. तर हलकर्णी फाटा ता चंदगड येथील मराठा चायनीज सेंटरच्या मागील बाजूस कल्याण मटका घेताना राजेंद्र रवळू सावंत (रा. हलकर्णी, ता. चंदगड, वय-५१) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्या कडील १२६२७रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर,पोलिस नाईक सूर्यकांत सूतार करत आहेत.No comments:

Post a Comment