तेऊरवाडीतील विष्णू बुच्चे कुटुंबियांचा आदर्श , म्हाळूंगे वृद्धाश्रमात अन्नदानाने केला बाळाचा वाढदिवस - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2021

तेऊरवाडीतील विष्णू बुच्चे कुटुंबियांचा आदर्श , म्हाळूंगे वृद्धाश्रमात अन्नदानाने केला बाळाचा वाढदिवस

म्हाळूंगे येथील सावली वृद्धाश्रमात अन्नदानाने रुद्रचा वाढदिवस साजरा करताना विष्णू बुच्चे वैशाली बुच्चे

तेऊरवाडी (एस. के. पाटील)

         आजकल मोठमोठ्या हॉटेलमध्ये वाढदिवस साजरे करणे ही एक फॅशन बनली आहे. पण या सर्वाला बाजूला ठेवत तेऊरवाडी (ता. चंदगड)  येथील विष्णू शिवाजी बुच्चे यानी आपल्या रूद्र या बाळाचा वाढदिवस चक्क म्हाळूंगे येथील सावली या वृद्धाश्रमामध्ये साजरा करून सर्व वृद्धांना अन्नदान दिले. वृद्धाश्रमात अन्नदान देणाऱ्या बुच्चे कुंटुबियाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       आज सर्वत्र डिजे च्या तालावर मोठमोठ्या हॉटेलमध्ये भव्य पार्टीचे नियोजन करून वाढदिवस साजरे करतानाचे दृष्य दिसून येते. यावर लाखो रुपयांची उधळपट्टी सुद्धा केली जाते. पण या सर्वाना फाटा देत येथील विष्णू बु्च्चे या प्राथमिक शिक्षकाने आपल्या बाळाचा वाढदिवस अनाथ असलेल्या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरवले. यासाठी पत्रकार एस. के. पाटील व संदिप तारिहाळकर यांच्या कडून माहिती घेऊन थेट म्हाळूंगे येथील सावली वृद्धाश्रम गाठले. येथील सर्व वृद्धांच्यासमवेतच रूद्रचा पाहिला वाढदिवस साजरा केला. पूर्ण दिवस या वृद्धासमवेत घालवून त्यांच्या दुःखावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केले. याबरोबरच सर्वाना अन्नदान दिले. यावेळी त्यांच्या सोबत  वडिल माजी सैनिक शिवाजी बुच्चे, आई सौ. रंजना, पत्नी सौ. वैशाली, मूलगी सईबाई, रूपाली पाटील, एकता फौन्डेशनचे अध्यक्ष दयानंद पाटील आदि मान्यवर व सर्व सावली वृद्धाश्रमातील वृद्ध उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment