१८ ते ४४ वयोगटातील नागरीकांनी लसीकरणाचासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे, जाणून घ्या........ - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2021

१८ ते ४४ वयोगटातील नागरीकांनी लसीकरणाचासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे, जाणून घ्या........

कोल्हापूर / वृत्तसेवा

         देशभरात १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. तथापि ही लस ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी केल्याशिवाय मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.  ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन मिळत होती. मात्र या वयोगटातील नागरिकांना हि सुविधा दिली जाणार नाही. यासाठी 'कोविन पोर्टल' किंवा 'आरोग्य सेतू ॲप' चा वापर करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील पद्धत वापरावी. २८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून याची नोंदणी करता येईल. 

 Google वर जाऊन https://www.cowin.gov.in/home ही लिंक ओपन करा. 

▪️ मोबाईल नंबर रजिस्टर करा व त्यावर आलेला OTP नोंदवा.

▪️ आपला आधार क्रमांक नोंदवा.

▪️ Gender सिलेक्ट करा.

▪️ जन्म वर्ष टाका.

▪️ वरील सर्व माहिती रजिस्टर करा.

▪️ पिन कोड टाका व त्यानुसार आलेल्या तारखेला लसीकरण schedule करा.

📲 आपणांस 2 मेसेजेस येतील त्यातील..

📲 पहिला मेसेज रेफरन्स ld लसीकरण केंद्रावर दाखवायचा आहे. 

📲 दुसरा मेसेज कोणत्या तारखेला लसीकरणासाठी जायचे आहे याचा आहे. 

हे दोन्ही मेसेजेस जतन करुन ठेवा.No comments:

Post a Comment