पाठलाग करून साडेसहा लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त,चंदगड पोलिसांची कामगिरी, कोठे घडली ही घटना..... - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2021

पाठलाग करून साडेसहा लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त,चंदगड पोलिसांची कामगिरी, कोठे घडली ही घटना.....

चंदगड पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या दारूसह आरोपी प्रतिक माळी.

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड ते गडहिंग्लज दरम्यान दारूने भरलेल्या गाडीचा पाठलाग करून साडे सहा लाखांची गोवा बनावटीची दारू चंदगड पोलीसांनी जप्त केली. गोवा बनावटीच्या दारुसह एकूण ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी  पो. कॉ.  वैभव शंकर गवळी यांनी चंदगड पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली असून आरोपी प्रतिक अशोक माळी (वय २३ रा. पाचवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) याला अटक केली आहे. गोवा बनावटीचा माल महाराष्ट्र राज्याचा कर चुकवुन विक्री करणेच्या उददेशाने वाहतुक करीत असताना सदर आरोपी आढळून आला. यामध्ये ६, ५०,०००  रुपयांची दारू,   पांढऱ्या रंगाची महिन्द्रा एक्सयुकी ५०० कंपनीची चार चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment