![]() |
ॲड. अनंत कांबळे |
चंदगड / प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी स्वत : च्या आरोग्याची काळजी घेत लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदगड पंचायत समितीचे सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी केले आहे.
चंदगड येथील लसीकरण केंद्रात वकील बार असोशिएसनचे अध्यक्ष ॲड. गोविंद दळवी, खजिनदार ॲड. संदीप पाटील, जेष्ठ विधीज्ञ एल. व्ही. भातखंडे, ॲड. आर. वाय. दळवी व इतर सदस्यांनी कोरोनाची लस घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, डॉ. अनुप काळगे, प्रज्ञा राणे, छाया पुजारी, विठ्ठल गावडे, एन. एस. गावडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment