मांडेदुर्ग सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह दक्षता कमिटीचे सदस्य कोरंटाईन - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2021

मांडेदुर्ग सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह दक्षता कमिटीचे सदस्य कोरंटाईन

 

मांडेदुर्ग : साफसफाई करताना सरपंच, उपसरपंच व पोलिस पाटील व अन्य.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

   मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांच्यासह अन्य ग्राम पंचायत व दक्षता कमिटीचे सदस्य गावातील शाळेमध्ये कोरंटाईन झाले आहेत. त्यांनी फावल्या वेळेत शाळेच्या साफसफाईला महत्त्व दिले आहे. याबाबत सरपंच म्हणाले, गावात आतापर्यंत नऊ कोरोना रुग्ण झाले आहेत. यापैकी काही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तरीही ग्रामस्थांनी योग्य आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोना पासून बचाव करावा. उपसरपंच म्हणाले, गावात कोरोना रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी निर्जंतुकीकरण करण्याचे काम गतीने सुरू आहे. सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. No comments:

Post a Comment