चंदगड : एल. जी. परीट यांचा सत्कार करताना किरण पाटील. शेजारी श्रीराम भोगण, ए. सी. गार्डे, वाय. पी. पोळ आदी. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) गावचे सुपुत्र व बेळगाव येथील रहिवासी एल. जी. परीट हे चंदगड तालुका कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक म्हणून शुक्रवार दि. ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त शुक्रवारी चंदगड येथे तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मंडल कृषी अधिकारी ए. सी. गार्डे यांनी केले. आभार लिपिक श्रीराम भोगण यांनी मानले. मंडल कृषी अधिकारी वाय. पी. पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषी कार्यालयाचे अधिकारी तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment