दाटे / सी. एल. वृत्तसेवा (उदयकुमार देशपांडे)
कर्नाटक गोवा राज्याच्या सीमेवर असणारा व दोन लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या चंदगड तालुक्यातील आरोग्य सेवा कोरोना महामारीच्या काळात रामभरोसे चालली आहे. देशभरात जोरदार संकट असतानाच तालुक्यात पुरेशा वैद्यकीय उपचाराअभावी कोरोना रूग्ण मृत्युमुखी पडत असतांना सुध्दा शासन व लोकप्रतिनिधी ना सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यात या घटकेला तरी अपयश आले आहे.
सुमारे २०० वाडी वस्त्या आणि गांवे असलेल्या या तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यास सुरुवात झाली आहे.अनेक सोयी जवळच उपलब्ध होत आहेत मात्र एकाही मल्टीसपेशालीसट हॉस्पिटल वा तज्ञ डॉक्टर नाही.एखाद्या गंभीर रुग्णाला बेळगांव कोल्हापूर अथवा गडहिंग्लज ला घेवून जावे लागते. त्यामध्ये अनेक अडचणी येत असतात त्यामुळे वेळेत उपचार न झाल्यामुळे रूग्ण दगावल्याचया घटना घडत आहेत.
गेली दहा वर्षे पाटणेफाटा येथे ट्रामा केअर उभारण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शासनाकडून जागा उपलब्ध होत नाही. त्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत अशाही तक्रार आहे. तर २६ वर्षापुर्वी एका नेत्यांच्या एकसष्टी च्या कार्यक्रमात एक सुसज्ज हॉस्पिटल उभारणयाचा निर्णय जाहीर करून यासाठी ६१लाख रूपयांचा निधी जमा करण्यात आला होता पण त्या निधीचे पुढे काय झाले हे समजत नाही.
कोरोनाची दुसरी लाट गावागावात जोर धरू लागली आहे.पहिल्या लाटेमध्ये प्रशासनाने गांभीर्याने विचार करून चांगले कोविड सेंटर उभारले होते. वैद्यकीय यंत्रणेने चांगले उपचार गभीर व अति गंभीर कोरोना रूग्णावरकेले होते. त्यामुळेच चंदगड कोविड केअर सेंटर कौतुकाला पात्र ठरले होते. पण पहिली लाट ओसरली तशी या सेंटर वरील सुविधा काढण्यात आल्या. तसेच हे केंद्र एका खाजगी इंग्लिश मेडीयम शाळेत सुरू करण्यात आले होते. त्यांनीही ईमारत ताब्यात देण्याचा तगादा लावला होता.दरम्यान दुसरी लाट पुन्हा येणार असल्याचा इषारा तज्ज्ञांकडून दिला जात होता.परंतु याचे गांभीर्य शासकीय यंत्रणेकडून घेतले गेले नाही.
चंदगड तालुक्यात दुसरी लाट हातपाय पसरणयास सुरुवात होऊन एक महिना उलटून गेला तरी चंदगड शहरात कोविड सेंटर सुरू करण्यास अपयश आले आहे. कानुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २०बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.तर चंदगड येथे खाजगी शाळेची इमारत घेवून तेथे सेंटर सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या रूग्ण संख्या वाढत असलयामुळे गडहिंग्लज व कोल्हापूर येथील बेड शिल्लक नाहीत त्यामुळे कांही रुग्णांवर त्याचे घरी अथवा गावातील शाळेत अलगीकरण करून ठेवण्यात आले आहेत. तर काहींना प्राणवायू व पुरेशी वैद्यकीय मदत मिळू न शकल्यामुळे प्राण सोडावे लागले. अशा घटना गेल्या आठवड्यात घडल्या आहेत.
कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधीं यांचा समन्वय असणे आवश्यक आहे.तालुक्यात एकुण १००बेडची तीन ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे आम.राजेश पाटील यांनी जाहीर केले आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा अपुरी पडणार आहे. कारण सध्या असणाऱ्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीयअधिकारी व इतर स्टाफ अपुरा आहे. या सेंटर साठी जादा स्टाफ व यंत्रणा उपलब्ध करून घेणे महत्वाचे आहे.
चंदगड तालुक्यात फक्त एकच शासकिय सेवेतील स्त्री रोग तज्ज्ञ आहे.दोन तीन जण एम. बी. बी. एस. खाजगी सेवेत आहेत. अन्य कोणत्याच रोगांवरील स्पेशालिस्ट नाहीत. हे तालुक्याचे दुर्दैव आहे.
तालुक्यात जवळपास १५० जण होमिओपॅथिक आयुर्वेदिक पदवीधर खाजगी प्रॅक्टीस करतात. त्यापैकी कांहीजणाची कोविड सेंटर साठी काम करण्याची इच्छा आहे.अशा काम करण्यास तयार असणाऱ्या डॉक्टराना शासनाकडून विमा कवच योग्य ते मानधन ईतर सुविधा उपलब्ध करून दिल्या तर हे काम करण्यासाठी डॉक्टर पुढे येतील. गेल्या आठवड्यात १५डाॅकटर कोरोना बाधित झाले असून ते उपचार घेत आहेत.
अहमदनगर येथील आमदार लंकेश यांनी कोविड रुग्णांसाठी केलेल्या कामाची चर्चा सध्या समाज माध्यमातून जोरात आहे. तर बेळगांव येथे अनेक मोठमोठे राजकिय पक्ष असताना म.ए.समितीने सुसज्ज असे कोविड सेंटर उभे करुन कौतुकास्पद काम केले आहे. अशा प्रकारचे काम चंदगड तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व दानशूर लोकांनी पुढे येऊन सध्या कोविड केअर सेंटर त्यानंतर सुपर मल्टीसपेशालीसट हॉस्पिटल उभे करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment