कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच चंदगड तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच कर्नाटक राज्याची सिमे लागत बेळगांव जिल्हातील प्रत्येक गावामध्ये रुग्ण सापडत असल्याने देवरवाडी (ता. चंदगड) गावामध्ये कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा इशारा म्हणून आज नोडल ऑफिसर राजश्री पचंडी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली देवरवाडी गावामध्ये दिनांक १७ मे पासून ते २३ मे पर्यंत संपूर्ण गाव लॉकडाऊन केले आहे.
गावातील ग्रामस्थ किंवा बाहेरील व्यक्ती विना मास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच विना परवाना वाहन आढळल्यास जप्त करण्यात येत आहे ह्याची बाहेरील ग्रामस्थांनी नोंद घ्यावी तसेच नाकाबंदी करण्यात आली आहे. यावेळी सरपंच उसरपंच सदस्य तसेच कोरोना दक्षता समिती सदस्य उपस्थिती होते.
1 comment:
Hyani gav lockdown kelay main road pn band kelay shetiche kame v saman gheun yenarya vahanana pn sodt nahit.
Post a Comment