बेळगावच्या एक्स्ट्रीम ग्रुपतर्फे चंदगड पोलिसांना मास्क, पाण्याच्या बाटल्या वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2021

बेळगावच्या एक्स्ट्रीम ग्रुपतर्फे चंदगड पोलिसांना मास्क, पाण्याच्या बाटल्या वाटप

 

चंदगड : पोलिसांना मास्क व पाण्याच्या बाटल्या वाटप करताना एक्स्ट्रीम ग्रुपचे कृष्णा पाटील, रघुनाथ देसाई. शेजारी जमीर मकानदार व अन्य कर्मचारी.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      बेळगाव येथील  एक्स्ट्रीम  ग्रुपतर्फे चंदगड येथे पोलिसांना मास्क व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. ग्रुपचे एमडी इंद्रजित प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम सुरू आहेत. गतवर्षापासून कोरोना काळात विविध ठिकाणी पोलिसांना तसेच गरजूंना मदत वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शनिवारी चंदगड येथे एक्स्ट्रीम सिक्युरिटीचे शिनोळी युनिट हेड कृष्णा पाटील व  फिल्ड ऑफिसर रघुनाथ देसाई यांच्या हस्ते चंदगड पोलिसांना मास्क व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.

       यावेळी हेड कॉन्स्टेबल जमीर मकानदार म्हणाले, एक्स्ट्रीम ग्रुपने कोरोना काळात सुरू केलेला सामाजिक उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहेत. एक्स्ट्रीम सिक्युरिटीचे शिनोळी युनिट हेड कृष्णा पाटील म्हणाले, एक्स्ट्रीम ग्रुप नेहमी समाजातील दुर्बल घटकांसाठी मदत करत आहे. यापुढील काळातही आम्ही गरजूंना मदत करू. रघुनाथ देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाबाबत चंदगडचे पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment