चंदगड / प्रतिनिधी :
श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ, गुजरात भवन बेळगाव गेल्या 60 वर्षांपासून अन्नदान सेवेसाठी परिचित आहे. संत श्रीजलाराम बाप्पा यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत. कोविड केअर सेंटर संत मीरा हायस्कूल येथे आम्ही गेल्या 15 दिवसांपासून कोविड रुग्णांना आणि कोविड योद्ध्यांसाठी सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पाठवित आहोत. बेळगांवचे पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गुजरात भवनला भेट दिली. संत जलाराम बाप्पा आणि आंबे मातेचे दर्शन घेतले. त्यांनी स्वयंपाकघरात देखील भेट दिली जिथे कोविड रुग्णांसाठी आणि कोरोना योद्ध्यांसाठी सुग्रास अन्न तयार केले जाते. गुजरात भवनचे सदस्य अन्नदानाची मनापासून सेवा बजावत आहेत हे पाहून त्यांना फार आनंद झाला. यावेळी संस्थापक सदस्य श्री भूपेंद्र पटेल, विजय भद्रा, भाविन पटेल, भावेश चुडासमा, श्रेयश दोशी, दक्षेत राणा, विपुल पटेल, गौरंग राणा, तेजस दोशी, बिजल राणा, नितीन भद्रा आणि हर्षल पटेल महादेव ठोकणेकर व राहुल पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment