बेळगाव लोकसभेवर भाजपच्या मंगला अंगडी विजयी, अटीतटीच्या लढतीत सतीश जारकीहोळी यांचा 5240 मतांनी पराजय - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2021

बेळगाव लोकसभेवर भाजपच्या मंगला अंगडी विजयी, अटीतटीच्या लढतीत सतीश जारकीहोळी यांचा 5240 मतांनी पराजय

 

मंगला अंगडी

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी विजयी झाल्या. काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांचा त्यानी 5240 मतांच्या फरकाने पराभव करून विजय संपादन केला.  अटीतटीच्या लढतीत शेवटच्या एका तासात चित्र पालटले आणि अंगडी यांनी निर्णायक आघाडी मिळवत विजयश्री खेचून आणला. भाजपच्या अंगडी यांना 4,35,202 तर काँग्रेसचे जारकीहोळी यांना 4,32, 299 मते मिळाली. समितीच्या शुभम शेळके यांना 1,24,642 मते मिळाली. माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या गोकाक मतदारसंघात 26,826 मते व बेळगाव दक्षिण मतदारसंघात 22,857 मते ही जारकीहोळी  यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. गतवेळच्या भाजपच्या मतांमध्ये मोठी घट झाली आहे. अरभावी मतदारसंघांमध्ये 15714,  उत्तर बेळगाव मतदारसंघात 12759, सौंदत्ती मतदारसंघात 16559 मते मिळवत जारकीहोळी यांनीही जोरदार टक्कर दिली. समितीच्या शुभम शेळके यांना 1,24,642 मते मिळाली. शेळके यांनी दक्षिण बेळगाव मध्ये 44,950 बेळगाव उत्तर मध्ये 24,594 बेळगाव ग्रामीण मध्ये 45,536 मते घेऊन राष्ट्रीय पक्षांना आगामी काळासाठी इशारा दिला आहे. शेळके यांना सव्वा लाख मते पडल्याने राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनीही लक्ष वेधून घेतले आहे.



No comments:

Post a Comment