सरोळी ग्रामपंचायतीला विद्याधर गुरबे यांच्या फंडातून औषध फवारणी मशिन भेट - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2021

सरोळी ग्रामपंचायतीला विद्याधर गुरबे यांच्या फंडातून औषध फवारणी मशिन भेट

 

प. स . सदस्य विद्याधर गुरबे यानी भेट दिलेल्या औषध फवारणी मशिन सोबत सरपंच मारूती पाटील व सदस्य

नेसरी / सी .एल. वृत्तसेवा

पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे यांच्या शेष फंडातून ग्रामपंचायत सरोळी ( ता. गडहिंग्लज ) यांना औषध फवारणी मशिन भेट म्हणून देण्यात आली . याकामी सरपंच मारूती पाटील यानी विशेष प्रयत्न केले .

    सध्या सर्वत्र कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे . त्यामूळे गावा- गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे . यासाठी वारंवार जादा मनुष्यबळ व ट्रॅक्टरची गरज भासत आहे मात्र या सर्वाला आर्थिक खर्च जास्त येत असल्याने ते ग्रामपंचायतींच्या आवाक्याबाहेरचे होत होते .नेमके हेच ओळखून प .स. सदस्य विद्याधर गुरबे यानी नेसरी सह सरोळी ग्रामपंचायतीला फवारणी मशीन दिली .पेट्रोलवर चालणारी हि फवारणी मशिन अत्यल्प खर्चात केवळ दोन व्यक्ति सहज हाताळू शकतात . त्यामूळे धडाडीचे व सर्व कामात अग्रेसर असणारे सरपंच मारूती पाटील यानी विद्याधर गुरबेंचे आभार मानले . यावेळी उपसरपंच प्रभाकर पाटील , सदस्य संजय पाटील, शंकर शिट्याळकर, प्रकाश जांबोटकर, आशिश आबिटकर, लक्ष्मण आंबीटकर, उत्तम कांबळे, संभाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment