चंदगड च्या "शिवसृष्टी" स्थळासाठी खा. मंडलिक यांच्या प्रयत्नातून २० लाखांचा निधी उपलब्ध - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2021

चंदगड च्या "शिवसृष्टी" स्थळासाठी खा. मंडलिक यांच्या प्रयत्नातून २० लाखांचा निधी उपलब्ध


 चंदगड/प्रतिनिधी :----
चंदगड शहरातील शिवसृष्टी स्थळासाठी खासदार प्रा.संजय  मंडलिक यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन असे दिलेले वचन पूर्ण करून पहील्या टप्प्यातील वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिली आहे.तसे मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी यांच्या करावी चंदगड नगरपंचायला प्राप्त झालयाची माहिती देण्यात आली  आहे.                                           चंदगड शहरातील गुरुवार पेठेतील राममंदिर जवळपास छ.शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी स्थळासाठी खासदार फंडातून तीस लाख रुपये चा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेन असे अभिवचन खासदार संजय मंडलिक यांनी छ.संभाजी चौक ते आंबेडकर नगर मधून पुढे जाणा-या रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी त्यांनी चंदगडच्या शिवसृष्टी स्थळासाठी आपल्या फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेन असे अभिवचन दिले होते.त्यांनी दीलेले वचन पूर्ण केले आहे निधी तील वीस लाख रुपये पहील्या टप्प्यात प्राप्त होत आहेत उर्वरित रुपये नंतर उपलब्ध होणार आहेत.खासदार मंडलिक यांनी शासनाकडून मिळणारा जिल्ह्यासाठी चा निधी चंदगडच्या शिवसृष्टी स्थळासाठीही उपलब्ध करून दिला त्याबद्दल चंदगड शहरवासीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.आमदार राजेश पाटील यांनी तर आपल्या आमदार फंडाचा पूर्ण साडे पाच कोटी रुपये चा निधी  आपल्या  चंदगड वासियांना देत असल्याचे जाहीर केले आहे त्यातून शहरातील काही कामे सुरू आहेत.शिवसृष्ठी स्थळामुळे चंदगडच्या वैभवात उत्तम भर पडणार आहे.या स्थळामुळे तरुण पिढीला छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अद्वीतीय कार्याचे स्मरण व अभिमान वृद्दीत वाढ कायम होत राहणार आहे.


No comments:

Post a Comment