कोरोना पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाटील यांचा आढावा दौरा - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2021

कोरोना पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाटील यांचा आढावा दौरा

 

कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत बोलताना आमदार राजेश पाटील सोबत प्रांताधिकारी विजया पांगारकर

तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या कोरोना कम्युनिटी स्प्रेड च्या अंतर्गत चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी विस्तृत आढावा घेतला. कोलिक ,माळुंगे ,तुडिये तसेच शिनोळी याठिकाणी वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन विभागाच्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर तहसीलदार विनोद रनावरे, बीडीओ श्री. बोडरे या सर्व प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन भागाचा दौरा केला.

        चंदगड तालूक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असलेल्या गावातील कोरोना दक्षता कमिट्या एकत्र घेऊन त्या त्या गावातील आरोग्य यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणा वाढवण्या च्या सूचना आमदार राजेश पाटील यानी केल्या ,कोरणा दक्षता कमिटी तसेच आशा, आरोग्य सेवक शिक्षक ,यांनी प्रत्येक घरात जाऊन कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग ची जबाबदारी योग्य रितीने पार पाडून सध्या जोरात सुरू असलेली कोरोना ची चेन लवकरात लवकर ब्रेक करण्याचे आवाहन आमदार पाटील यानी केले .आपल्या तालुक्यात कोरोना प्रतिबंध करायचा असेल तर कोरोणा प्रतिबंधक त्रिसूत्रीचा अवलंब आपण नक्की करावा तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ची जाणीव करुन देण्यास ही ते विसरले नाहीत या दौऱ्यात शासकीय यंत्रणेने सोबत तूर्केवाडी जि प सदस्य अरुण सुतार, माजी सभापती चिगरे , कोवाड चे माजी सरपंच विष्णू आढाव, तुडये चे माजी सरपंच मारुती पाटील, तुडये तसेच कोलिक गावचे सरपंच व कोरोना दक्षता कमिटी ,पोलीस पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment