'लस नाही! तर रेशन नाही!' असा शासकीय आदेश आहे का? निवेदनाद्वारे विचारणा - चंदगड लाईव्ह न्युज

01 May 2021

'लस नाही! तर रेशन नाही!' असा शासकीय आदेश आहे का? निवेदनाद्वारे विचारणा

तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे मागणीचे पत्र देताना बहुजन मुक्ती पार्टी चे प्रभारी प्रकाश नाग.


चंदगड : सी एल वृत्तसेवा
 सध्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात लसीकरण युद्धपातळीवर सुरु आहे. हे लसीकरण शंभर टक्के होण्याच्या दृष्टीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बहुतांशी ग्रामपंचायत व विकास सेवा संस्था स्तरावर लस न घेतलेल्या नागरिकांना रेशनवरील धान्य किंवा इतर शासकीय सुविधा न देण्याचे धोरण अवलंबल्याचे समजते. याबाबत अशा प्रकारची अडवणूक करण्याचा आदेश किंवा परिपत्रक शासनस्तरावरून आलेला आहे का? अशी विचारणा बहुजन मुक्ती पार्टी, चंदगड तालुका शाखेच्यावतीने तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे करण्यात आली असून याबाबतची माहिती तीन दिवसात मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे तालुका प्रभारी प्रकाश आप्पाजी नाग, रा. देवरवाडी यांची सही असून निवेदन देताना नाग यांच्यासह गजानन तरवाळ, अमित कांबळे, धोंडीबा बामणे आदींची उपस्थिती होती.
       या मागणीमुळे येनकेन प्रकारे कोरोना महामारी ला अटकाव करणाऱ्या यंत्रणेतील स्वयंसेवकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.





No comments:

Post a Comment