चंदगड आगारातून निगडी, कोल्हापूर, सांगली बरोबरच आता 'चंदगड-मुंबई' बससेवा सुरु.......... - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2021

चंदगड आगारातून निगडी, कोल्हापूर, सांगली बरोबरच आता 'चंदगड-मुंबई' बससेवा सुरु..........


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
 

       मागील आठवड्यात निगडी, कोल्हापूर, सांगली या मुक्कामी बस नंतर चंदगड आगाराने आता चंदगड- परेल (मुंबई) बस दि. १६ जून पासून सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. ही बस चंदगड मधून सकाळी ०७.४५ वा सुटेल तर परेल हून सकाळी ६ वाजता निघेल. या सर्व गाड्यांचा भागातील प्रवाशांनी लाभ घेऊन आपला प्रवास सुखकर करावा असे आवाहन आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी केले आहे.

      राज्य परिवहन महामंडळाला कोरोना महामारी चा मोठा फटका गेल्या सव्वा वर्षात बसला आहे. कोरोना चा प्रकोप सुरूच असला तरी चंदगड आगाराचे नवे व्यवस्थापक अमर निकम यांनी विविध मार्गावर बससेवा सुरू करून दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे.

      चंदगड आगारातून दिवसभरात परेल- मुंबई सकाळी ७.४५, कोल्हापूर सकाळी ७.१५, दुपारी २.०० व  सायंकाळी ५.०० वाजता (मुक्काम), निगडी- पुणे सकाळी ९.०० (मुक्काम) तर सांगली (मुक्काम) दुपारी ४.०० वाजता चंदगड मधून निघतात. याशिवाय सकाळी ८.००  व दुपारी १२ वाजता चंदगड- गडहिंग्लज-चंदगड या सेवा सुरू केल्या आहेत. लॉक डाउन शिथिल होताच ग्रामीण फेर्‍या सुरू केल्या जातील. चंदगड आगार व परिवहन महामंडळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रवाशांनी 'एसटी' चा वापर करावा असे आवाहनही निकम यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment