तेऊरवाडीचे एकता फौंन्डेशन आले धावून, अनं रस्त्यावरचे पाणी गेले वाहून - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2021

तेऊरवाडीचे एकता फौंन्डेशन आले धावून, अनं रस्त्यावरचे पाणी गेले वाहून

तेऊरवाडी येथील रस्त्यावरील पाणी बाहेर काढताना एकता फ़ौन्डेशनचे कार्यकर्ते

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         रस्त्यावर सतत गुडघाभर पाणी. दोन्ही बाजूना चढाव आणि वळण. यामूळे वारंवार होणारे आघात.  या सर्वाला वैतागून तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील एकता फौंन्डेशनचे युवक हातात फावडे ,टिकाव घेऊनआले धावून अन पाहता पाहता रस्त्यावरील पाणी गेले वाहून. युवकांचे हे कार्य खरचं  कौतुकास पात्र आहे.

          सध्या चंदगड तालूक्यात पावसाची जोरदार बॅटींग चालू आहे. यामूळे अनेक रस्त्यावर पाणी आले आहे. पण ते पाऊस ओसरला की कमी होते. पण तेऊरवाडी येथील नवीन वसाहतीच्या ठिकाणी असलेल्या कोवाड- नेसरी मार्गावरील तलावाजवळ वेगळी परिस्थिती आहे. या ठिकाणी एका बाजूला तलाव तर दुसऱ्या बाजूला खोल भाग. त्याचबरोबर कोवाड व नेसरीकडे जाणाऱ्या या रस्त्यावर मोठे चढण. त्यामुळे दोन्ही बाजूनी येणारे पाणी या रस्त्यावरील सखल भागात साचत होते. बांधकाम विभाग याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. गेल्या आठवड्यापासून जोरात पाऊस पडत असल्याने येथे प्रचंड प्रमाणात पाणी साचत होते. यामुळे या पाण्यात अनेक दुचाक्या घसरून  पडत होत्या. मागील महिन्यात तर याच जागी मळी वाहतूक करणार टॅकर पलटी झाला होता. या मळीमध्ये  पडूनअनेक वाहनधारक जखमी झाले होते. पुन्हा येथे पाणी साचून अपघात होत आसल्याचे सोशल मिडियावर मेसेज व्हायरल  झाला, अन लगेचच एकता फौंन्डेशन २०-२५ कार्यकर्ते हातात टिकाव फावडे घेऊन कामाला लागले. लगेचच ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भिंगुडे यानीही या कामामध्ये सहभाग घेतला. काम जास्त असल्याने कोवाडहून जेसिबी मागवण्यात आला. बघता बघता रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला वाट करून देण्यात आली. रस्त्यानेही मोकळा श्वास घेतला . त्यामूळे वाहनधारकाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी  एकता फौंन्डेशनचे अध्यक्ष दयानंद पाटील, भारतिय सैन्यदलातील जवान अमोल पाटील, अश्र्वीन पाटील, सुधिर पाटील, जयसिंग पाटील,कृष्णा पाटील, संतोष कुंभार, ऋतिक पाटील, लखन पाटील, वैभव पाटील, प्रसाद पाटील, विजय पाटील, आनंद पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष कृष्णा पाटील, एस .के. पाटील आदिजन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment