चंदगड मराठी अध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय पत्रलेखन स्पर्धेत कोल्हापूरची क्षितीजा पाटील माध्यमिक गटात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2021

चंदगड मराठी अध्यापक संघ आयोजित जिल्हास्तरीय पत्रलेखन स्पर्धेत कोल्हापूरची क्षितीजा पाटील माध्यमिक गटात प्रथम


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

    चला संवेदना जागवूया या उपक्रमातंर्गत जिल्हास्तरीय ऑनलाईन पत्रलेखन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहिर करण्यात आला.

      कोरोनास पत्र या विषयाला अनुसरून स्पर्धेत प्राथमिक गटात४८, माध्यमिक गटात २३ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक गटात या स्पर्धेत अनुक्रमे कु. प्रतिक्षा राजेंद्र सावंत (हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी, ता. गडहिंग्लज), श्रीधर सुधाकर माने (धनंजय विद्यालय नागनवाडी) व कु. धनश्री महादेव शिवणगेकर (बागिलगे डुक्करवाडी हायस्कूल,डूक्करवाडी ता. चंदगड) तर माध्यमिक गटात कु. क्षितीजा संदिप पाटील (श्री राजर्षी शाहू हायस्कूल, कोल्हापूर) कु. दर्शना दिपक वाके (दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड), कु. प्रांजल प्रकाश पाटील (छत्रपती शिवाजी हायस्कूल, प्रयाग चिखली, करवीर) यांनी क्रमांक पटकावले. लवकरच सर्व विजेत्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष एम. एन. शिवणगेकर, बी. एन. पाटील, एस. पी. पाटील, व्ही. एल. सुतार, एच. आर. पाऊसकर, फिरोज मुल्ला, संजय साबळे, रवि पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.



1 comment:

Unknown said...

Best of luck for your future

Post a Comment