जागतिक पर्यावरण दिनानिमित्य दाटे येथे वृक्षारोपन - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्य दाटे येथे वृक्षारोपन

 

दाटे येथे वृक्षारोपन करताना सरपंच अमोल कांबळे, संदिप गुरव , संजय साबळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गावावर कोरानाचे संकट ओढवल्यावर अनेक रूग्णांना ऑक्सिजनसाठी खूप धडपडावे लागले. ही धडपड उघड्या डोळयांनी पाहणारे दाटे, ता.चंदगड, जि. कोल्हापूर येथील अनेक तरूण  रयत सेवा फौंडेशन,दाटे च्या छताखाली एकत्र आले. चर्चा करून गावात मंदिर,ओसाड, मोकळ्या जागेवर ऑक्सीजन पुरक झाडे लावण्याचा निर्धार केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्य दाटे ( ता. चंदगड ) येथे विविध औषधी वृक्षांचे रोपन करण्याा आले .
      यावेळी रयत सेवा फौंडेशनचे मार्गदर्शक मंत्रालयीन अधिकारी घनश्याम पाऊसकर म्हणाले, " आज कोरोनासारख्या महामारीमुळे ऑक्सीजनची उणीव भासू लागली आहे. जगभरात वाढत्या तापमानाची समस्या सर्वांना भेडसावत आहे . ही समस्या निर्माण होण्यास मानवच जबाबदार आहे. त्याचे भयानक परिणाम भोगायला लागू नयेत यासाठी आपणच पर्यावरण रक्षणाचा वसा हाती घेतला पाहिजे. वृक्षसंवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. " आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परिसरात मुबलक  वनऔषधी सुशोभीकरणाची झाडे लावण्यात आली. अशोक, कडूलिंब, आवळा, तुळस,  पारिजातक, गुलमोहर इ. तसेच रंगीबेरंगी फुलांची  रोपे लावण्यात आली. यावेळी सरपंच अमोल कांबळे, पोलीस पाटील संदिप गुरव,फाउंडेशनचे  परशराम किणेकर,  संजय साबळे , ज्ञानेश्वर गावडे, मारूती किंदळेकर, सचिन कांबळे, संतोष मोरे, महादेव साबळे ऋषिकेश सातर्डेकर,वैजनाथ तेरणीकर,शाहू खरूजकर,मोहन आवडण उपस्थित होते.



No comments:

Post a Comment