किणी येथे जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष संवर्धन - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2021

किणी येथे जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष संवर्धन

किणी येथील गौळटेकडीवर लावलेल्या झाडांना कुंपण करताना मंडळाचे कार्यकर्ते.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     पर्यावरण संतुलन बिघडल्यास मानवी जीवन व प्राणिमात्रावर विपरीत परिणाम होतो. हे ओळखून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पर्यावरणाचे महत्व विषद करणाऱ्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" या उक्तीला अनुसरून किणी, ता. चंदगड येथील काही ध्येयवेडे तरुण एक दिवस गावासाठी या उपक्रमातून गेली चार वर्षे रस्त्यांच्या दुतर्फा व माळरानावर वृक्षारोपण करून त्यांचे जतन करत आहेत. याकामी आठवड्यातून एक दिवस ते आपला वेळ देतात. त्यांनी आजवर रस्त्याच्या दुतर्फा, गायरान, गौळटेकडी आदी ठिकाणी विविध जातींची शेकडो झाडे लावून जगवली आहेत. आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यापूर्वी गौळदेव टेकडीवर लावलेल्या झाडांना कुंपण केले. गेल्या चार वर्षात वृक्षसंवर्धनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या मंडळात संजय कुट्रे, जयप्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर, माजी सरपंच गोपाळ कुंभार, विठ्ठल नांदूडकर (गुरुजी), माजी उपसरपंच परशराम हुंदळेवाडकर, गजानन मनगुतकर, विवेक मनवाडकर, माजी सैनिक जोतिर्लिंग कदम आदींचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment