कालकुंद्रीचे निवृत्त सैनिक शिवाजी पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2021

कालकुंद्रीचे निवृत्त सैनिक शिवाजी पाटील यांचे निधन

शिवाजी पाटील


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        मुळचे कालकुंद्री, देव गल्ली (ता. चंदगड) व सध्या काकती, आंबेडकरनगर (ता. बेळगाव) येथील माजी सैनिक शिवाजी सुबराव पाटील  (वय 72) यांचे पुणे येथे कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. 1971 च्या भारत-पाक युद्धात त्यांचा सहभाग होता.

         त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. काकती येथे सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. पुणे येथील अभियंता  संभाजी पाटील यांचे ते वडील तर बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (प्रोफेशनल सेल) विशाल पाटील, नागपूर येथील आर्मी ट्रेनिंग अकॅडमीचे इनस्ट्रेक्टर (प्रशिक्षक) ईश्वर पाटील यांचे ते काका होत.No comments:

Post a Comment