बागिलगे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2021

बागिलगे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या


लक्ष्मण भरमाना पाटील

चंदगड / प्रतिनिधी

      बागिलगे (ता. चंदगड) येथील लक्ष्मण भरमाना पाटील (वय वर्षे २६) याने राहत्या घरी  तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

       मयत लक्ष्मण हा  गोव्यामध्ये नोकरी  करत होता. काल सकाळी तो गावी आला होता. घरी कोणी नसल्याचे बघून घरातील तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लक्ष्मण याच्या पश्चात आई, दोन विवाहित बहीणी असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. महादेव दिंडे यांच्या वर्दीवरून घटनेची नोंद चंदगड पोलिसात करण्यात आली आहे.No comments:

Post a Comment