![]() |
नेसरी येथील कोलेकर महाविद्यालय |
नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नित, शिक्षण समिती क।। नेसरी ( ता. गडहिंग्लज )संचलित, तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागाच्यावतीने शुक्रवार (ता. १८) जून रोजी' भारतीय लोकशाहीची ७० वर्षे' या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय ई-चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्राचे उदघाटन शिक्षण समिती कसबा नेसरीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अॅड हेमंत कोलेकर यांच्या हस्ते होणार आहे.
बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या माजी अधिष्ठाता, मानव्य विद्याशाखा तथा अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ डॉ. भारती पाटील, भवन्स गांधी सेंटर ऑफ सायन्स अॅण्ड ह्यूमन व्हॅल्यूज भारतीय विद्या भवन बेंगलोरच्या डायरेक्टर डॉ. मीना देशपांडे, राजकीय विश्लेषक तथा राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉ. प्रकाश पवार, पारनेर काॅलेजचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख सह. प्रा. विरेंद्र धनशेट्टी मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थान अनुक्रमे अॅड. कोलेकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रविंद्र भणगे, न्यू कॉलेज कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील संस्था संचालिका डाॅ. अर्चना कोलेकर भूषविणार आहेत. अशी माहिती प्र. प्राचार्य डाॅ. एस. बी. भांबर, समन्वयक तथा राज्यशास्त्र विभागाचे डॉ. एच. एस. कुचेकर आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए. ए. देसाई यांनी दिली.
No comments:
Post a Comment