गडहिंग्लज येथे आज महागाई विरोधात आंदोलन, वाचा आहेत मुद्दे - चंदगड लाईव्ह न्युज

15 June 2021

गडहिंग्लज येथे आज महागाई विरोधात आंदोलन, वाचा आहेत मुद्दे

 

गडहिंग्लज येथे महागाई विरोधात आंदोलन करताना शरद पाटील, किरण कांबळे आदि

गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

         बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज गडहिंग्लज येथे पेट्रोल, डिझेल, गॅस, लाइटबिल यांच्या महागाई विरोधात गाडीला धक्का मार आंदोलन करण्यात आले.

     सध्या राज्यात पेट्रोल, डिझेल  आदि सर्वच इंधनांचे दर आकाशाला भिडले आहेत. यामध्ये सर्वसामान्य माणूस होरपळला जात आहे. या विरोधात बहूजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शरद पाटील, किरण कांबळे, किरण क्रांतिसेन, उल्हास त्रिरत्ने, गौतम मोरे, राहुल मोरे, यलापा हराळे, दशरथ पाटील, सुनील नागदिवे आदी सहभागी झाले.

No comments:

Post a Comment