![]() |
वाढदिवसाच्या पैशातून महागावात सॅनिटायझर फवारणी करताना श्रीशैल्य व त्यांचे मित्र. |
महागाव / सी. एल. वृत्तसेवा
आपल्या वाढदिवसाला होणारा हजारो रुपयांचा खर्च टाळून महागाव (ता. गडहिंग्लज) येथील युवक श्रीशैल कल्लापा तेली याने कोरोना प्रतिबंधक क्षेत्रामध्ये सॅनिटयझरची फवारणी करुन परिसरात आदर्श निर्माण केला.
सध्या वाढदिवस म्हणजे रंगीत, संगीत पार्टी, हजारो रूपयांची उधळपट्टी, डिजेच्या तालावर नाच गाणे. या कोरोणाच्या काळातही लपून -छपून वाढदिवस साजरे केले जात आहेत. पण या सर्वाला फाटा देत महागाव येथील श्रीशैल्य यांनी वेगळाच उपक्रम राबवला. आपल्या वाढदिवसाला पैसे खर्च न करता त्याच पैशातून सॅनिटायझरची खरेदी केली. मित्रांच्या सहय्याने या सॅनिटायझरची फवारणी महागावातील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्राबरोबरच इतर गल्यातुनही केली. कोरोना मुक्तीसाठी आपल्या वाढदिवसाच्या पैशांचा उपयोग समाजासाठी करणाऱ्या या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संकटे कधीही सांगून येत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाच्या काळात फुल ना फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे आपापल्या कुवतीप्रमाणे समाजासाठी योगदान देणे काळाजी गरज बनली आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या श्रीशैल्य यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment