पुरग्रस्तांचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी - विजयभाई जंगमहट्टीकर - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2021

पुरग्रस्तांचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी - विजयभाई जंगमहट्टीकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           नुकताच झालेल्या महापुरामुळे तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व इतरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी असी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे चंदगड विधानसभा मतदार संघातील विजयभाई जंगमहट्टीकर यांनी केली आहे.                                                         १९ जुलै ते २४ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील अनेक शेतकरी, व्यापारी व इतरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  शासन निर्णय नुसार नुकसान भरपाई संदर्भात विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावयाचे आहे. यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संबंधित अर्ज कामी मदत करण्यात येणार आहे. पाटणे फाटा येथे प्रकाश कोल्हाळ व चंदगड येथे आशिष कुतिन्हो (नविन वसाहत, चंदगड) येथे संबंधित नुकसानग्रस्त बांधवांनी संपर्क साधावा असे आवाहन श्री. जंगमहट्टीकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment