पिळणी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पांडुरंग चौगुले यांचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2021

पिळणी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पांडुरंग चौगुले यांचा उपक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करताना चौगुले मामा, केंद्रप्रमुख जगताप सोबत अखलाक मुजावर आदी मान्यवर.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

               पांडुरंग चौगुले- मामा, महागाव, ता ‌ गडहिंग्लज (निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक व संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस कुटुंब समाज सेवी संस्था मुंबई, पोलीस पत्नी मंच व बचत गट) यांच्यावतीने चंदगड तालुक्यातील दुर्गम मराठी विद्यामंदिर पिळणी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. केंद्रप्रमुख जीबी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते अखलाकभाई मुजावर उपस्थित होते. 

             यावेळी मुजावर, चौगुले मामा, ॲड पांडुरंग शिंदे, आप्पासाहेब सुरंगे (निवृत्त पोलिस उपनिरीक्षक) शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर गावडे आदींची समयोचित भाषणे झाली. महागाव येथील दानशूर व्यक्तिमत्व पांडुरंग चौगुले मामा यांच्यामार्फत चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शालोपयोगी साहित्य वाटप केले जाते. याबरोबरच रायगड व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्यांचे समाजकार्य मोठे आहे. गेल्या चार-पाच वर्षात त्यांच्यामार्फत लाखो रुपयांचे साहित्य विविध शाळांना वाटप करण्यात आले आहे. त्यांच्या समाजकार्याला वक्त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक एच बी पाटील शिक्षक एल टी गावडे, प्रकाश सोनार, स्मिता शेटकर, शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment