कुदनूर येथे नवक्रांती गणेश मंडळाची मुहूर्तमेढ उभी - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2021

कुदनूर येथे नवक्रांती गणेश मंडळाची मुहूर्तमेढ उभी

कुदनुर येथे गणेश मंडळाची मुहूर्तमेढ रोवताना सागर 
मणगुतकर  व मंडळाचे कार्यकर्ते

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        कुदनूर (ता. चंदगड) येथील नवक्रांती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने १३ व्या गणेश उत्सव समारंभाची मुहूर्तमेढ  नागनाथ ट्रेडर्सचे मालक सागर मणगुतकर यांच्या हस्ते रोवली.

       कोरोणाच्या या महामारीमध्ये सांस्कृतिक परंपरा जोपासणे आवश्यक असले तरी अत्यंत साध्या पद्धतीने यावर्षी गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी बोलताना अमर कोले यानी केले. यावेळी विठ्ठल आंबेवाडकर, सुरज आंबेवाडकर, महेश मोहनगेकर, विकास मोहनगेकर, सुभाष मोहननेकर, राजू कुंभार आदि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष महेश गुंडकल यानी केले. तर आभार अध्यक्ष विजय आंबेवाडकर यानी मानले.

No comments:

Post a Comment