![]() |
बुझवडे येथील घरकुलोची पाहणी करताना सभापती ऍंड . अनंत कांबळे , प. स . सदस्य बबन देसाई व मान्यवर |
तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा
बुझवडे (ता चंदगड ) येथे रमाई आवास योजने अंतर्गत सुरु असणाऱ्या 26 गृहसंकुलांना पंचायत समिती सभापती ऍड. अनंत कांबळे, माजी सभापती विद्यमान सदस्य बबन देसाई यांनी भेट देवून घरकूलांच्या बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले.
त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शन खाली घरकुलाला प्रशासकीय मान्यता भेटली त्या विस्तार अधिकारी सौ. अमृता देशपांडे तसेच ज्याच्या तांत्रिक मार्गदर्शना खाली बांधकाम प्रगती पथावर आले ते गृहनिर्माण अभियंता रजत हुलजीं, धैर्यशील यादव, ग्रामसेवक प्रशांत सुतार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी यावेळी उपस्थित होते.
एकाच ठिकाणी इतक्या संख्येने होणारी हि घरकुले महाराष्ट्र राज्यात आदर्श देणारी आहेत. त्यामुळे केवळ कोल्हापूर जिल्हयातच नाही तर विभाग स्तरावर, राज्य स्तरावर यांची दखल घेऊन विशेष पारितोषिक देण्याबाबत शासना सोबत पाठपुरावा करणार असल्याचे श सभापती श्री कांबळे यांनी मत व्यक्त केलं.
No comments:
Post a Comment